मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवर धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईतील जुहू इथल्या जेव्हीपीडी जंक्शनजवळ ही घटना घडली असून या घटनेनंतर निवेदिता यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना रविवारी घडल्याची माहिती आहे. निवेदिता सराफ रविवारी रात्री त्यांच्या गाडीनं विलेपार्ले इथून घरी जात होत्या. याच दरम्यान जेव्हीपीडी सिग्नलजवळ एका कारनं निवेदिता यांच्या गाडीला मागून जोरात धडक दिली. यानंतर निवेदिता यांच्या गाडीचा ड्रायव्हर कारमधून उतरला आणि गाडीची पाहणी करू लागला. कारचं काही नुकसानं वैगेरे झालं का हे पाहत असतानाच गाडी ठोकलेल्या व्यक्तीनं निवेदिता यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर निवेदिता यांनी या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आंतरराष्ट्रीय भरारी! अभिनेता संदीप पाठकवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
गाडी ठोकलेल्या व्यक्तीनं केवळ निवेदिता यांच्या ड्रायव्हरलाच मारणाह केली नाही तर, मला देखील धमकावलं, असं निवेदिता यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय. या व्यक्तीनं ‘गाडीची काच खाली कर’, असं म्हणत निवेदिता यांना मकण्याचा प्रयत्न केला.
…म्हणून मालिका स्वीकारली, निवेदिता सराफ यांनी सांगितलं कारण
निवेदिता यांच्या गाडीला मागून धडक दिलेल्या गाडीची माहिती पोसिसांना मिळाली असून ही गाडी नाशिक नोंदणीकृत असल्याचं समजतं. पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत.

निवेदिता यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘भाग्य दिले तू मला’ या आगामी मालिकेत त्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here