मॉस्को : रशियाकडून सतत होत असलेल्या हल्ल्यांनी बेजार झालेल्या युक्रेनने अखेर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या सीमेपासून ४० किलोमीटर आतमध्ये असणाऱ्या बेलगोरोड शहरात घुसून एअर स्ट्राइक केला. या हवाई हल्ल्यात रशियातील इंधन तळ उद्ध्वस्त झालं आहे. मात्र रशिया युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांना योग्य ठरवण्यासाठी आपल्याच प्रदेशात बनावट हल्ला करू शकतं, असं अनेक पाश्चिमात्य देशांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या एअर स्ट्राइकमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. (Russia Ukraine War Latest Updates)

युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी शहरात घुसून एस-८ रॉकेट हल्ला केला, असा आरोप बेलगोरोड शहराचे राज्यपाल व्याचेस्लाव्ह ग्लॅडकोव्ह यांनी केला आहे. या हल्ल्यामुळे बेलगोरोड शहरातील इंधन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तसंच दोन कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत.

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर ३८ व्या दिवशी युक्रेनमधून धक्कादायक माहिती

सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

युक्रेनने रशियावर केलेल्या हवाई हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनुसार सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी हा हल्ला करण्यात आला. रशियाच्या इंधन तळावर हल्ला केल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.

युक्रेनकडून अधिकृत भाष्य नाही!

रशियावर केलेल्या हल्ल्याबाबत अद्याप युक्रेनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच युक्रेनने हा हल्ला केला की आपले आक्रमण योग्य ठरवण्यासाठी आणि सहानुभूती निर्माण करण्यासाठी रशियानेच आपल्या भागात हल्ल्या घडवून आणला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here