क्लिक करा आणि वाचा-
याबाबत अधिक माहिती अशी की, तारु पिंपळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले अशोक जिजाऊ पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दारू पिऊन दारूच्या दुकानात गोंधळ घातला. त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यावर पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांना सुध्दा शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थितीत असलेल्या महिला पोलिसांना सुद्धा या गुरुजींनी शिवीगाळ करत गुन्हा का दाखल करत नाही म्हणून गोंधळ घातला.
क्लिक करा आणि वाचा-
समज देऊन सुद्धा गुरुजी आयकत नसल्याने पोलीस सुद्धा हतबल झाले होते. कर्मचारी समजून सांगत होते, अधिकारी समज देत होते मात्र गुरुजी काही आयकायच्या परिस्थितीत नव्हते. एवढच नाही तर जोरजोरात शिवीगाळ करून परिसरात गोंधळ घातला. अखेर दारूची नशा उतरल्यावर गुरुजी भानावर आले. त्यानंतर पोलीसांनी गुरुजीवर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हा गोंधळ सुरू असताना नेमकं काय झालं म्हणून अनेक लोकं ठाण्याचा परिसरात जमा झाले होते.
क्लिक करा आणि वाचा-