राज्य सरकारने करोनासंदर्भातील निर्बंध दूर केल्यानंतर मुंबई महानगरीत आज सकाळपासून शोभा यात्रा आणि स्वागत यात्रानी मराठी नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. दादर, गिरगाव, मुलुंड, ठाणे, डोंबिवली इथले मुख्य रस्ते नववर्ष स्वागत यात्रांनी फुलून गेले आहेत.

 

gudhi padwa : गुढी पाडव्याला मुंबईत शोभा यात्रांना सुरुवात
gudhi padwa : गुढी पाडव्याला मुंबईत शोभा यात्रांना सुरुवात

हायलाइट्स:

  • राज्य सरकारने करोनाचे निर्बंध पूर्णपणे रद्द केले
  • तब्बल दोन वर्षांनी आज मुंबई नगरीत नव वर्षाचे जल्लोषात स्वागत
  • ठिकठिकाणी शोभा यात्रा आणि स्वागत यात्रांचे आयोजन
मुंबई : राज्य सरकारने करोनाचे निर्बंध पूर्णपणे रद्द केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी आज मुंबई नगरी शोभा यात्रा आणि स्वागत यात्रांनी दणाणून निघाली आहे. आज शनिवार सकाळपासून दादर, गिरगाव, बोरिवली, मुलुंड, ठाणे, डोंबिवली याठिकाणी ढोल-ताशे, लेझीम पथकासह नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर काढलेल्या भव्य रांगोळ्या लक्ष वेधून घेत आहेत.

गिरगावात आज सकाळपासून नव वर्ष स्वागत यात्रा सुरु झाली आहे. ढोल -ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. या स्वागत यात्रेत १५ चित्ररथ सहभागी झाले आहेत. ज्यात गणेश उत्सव, डबेवाल्यांचा चित्ररथ, महिला आणि लहान मुलांचे लेझीम पथक, ढोल पथक सहभागी झाले आहेत. स्वागत यात्रेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

gudhi  padwa

ठाण्यात स्वागत यात्रेत मल्लखांबपट्टू सहभागी झाले असून यात मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. त्याशिवाय तलवारबाजी, दांडपट्टा यासारख्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक शोभा यात्रेत सादर करण्यात आले. मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ यंदाच्या स्वागत यात्रांचे वैशिष्ट्य आहे. आज दादरमध्ये पहिल्यांदाच नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. ढोल ताश्यांचा गरज सुरु आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : new year celebration in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here