औरंगाबाद : दौलताबादजवळील पोटूळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर घटनास्थळी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून, रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अचानक झालेल्या या सर्व घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री तीन वाजेच्या दरम्यान मुंबई हादीलाबाद नंद्रीग्राम एक्स्प्रेस रेल्वे औरंगाबाद-दौलताबाद जवळील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ आली असताच चोरट्यांनी रेल्वे नर्जळ स्थळी येताच रेल्वेची चैन ओढली आणि त्यानंतर गाडी थांबताच प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि सोने काढून घेतले. इतकंच नाहीतर काही प्रवाशांच्या बॅगही हिसकावून घेतल्या. तर काही प्रवाशांना मारहाण झाली असल्याचीही माहिती आहे.

शोभा यात्रांनी मुंबई नगरी दणाणून निघाली; मराठी नववर्षाचे दणक्यात स्वागत
चोरट्यांच्या या धुमाकूळाची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा घटनास्थळी पोहोचत घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर रेल्वे पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, घडलेल्या घटनेनंतर या रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! म्हाडाची महाघरबांधणी, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये उभारणार घरं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here