train timetable 24 hour time: पुणे, औरंगाबादकडे धावणाऱ्या ९ गाड्या ‘या’ कारणामुळे रद्द, प्रवाशांची प्रचंड गैरसोय – train running status 9 trains running to pune aurangabad canceled huge inconvenience to passengers
परभणी : मालवाहू मालगाडीचे डब्बे दौलताबाद स्टेशनजवळ रेल्वे रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावरुन मनमाकडे धावणार्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून शनिवार ३० एप्रिल रोजी देण्यात आली आहे. परभणी रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दौलताबाद रेल्वे स्थानकावर मालवाहू नेणार्या मालगाडीचे पाच डब्बे रेल्वे रुळावरुन कोसळले आहेत. या अपघातामुळे मेन लाईन बंद झाली आहे. त्याचा परिणाम आता परभणी रेल्वे स्थानकावरुन धावणार्या गाड्यांवर झाला आहे. परभणी रेल्वे स्थानकावरुन धावणारी हैद्राबाद – औरंगाबाद गाडी परभणी ते औरंगाबाद, औरंगाबाद – हैद्राबाद गाडी औरंगाबाद ते परभणी दरम्यान, निजामाबाद – पुणे दरम्यान, मनमाड – नांदेड, रेनीगुंठा ते नांदेड दरम्यान, धर्माबाद – मनमाड, औरंगाबाद ते मनमाड दरम्यान, मनमाड – धर्माबाद गाडी मनमाड ते औरंगाबाद दरम्यान, काचिगुडा – रेनीगुंठा गाडी नांदेड ते रेनीगुंठा दरम्यान, रेनीगुंठा ते काचिगुडा गाडी पोटुल ते नांदेड दरम्यान आणि नरसापुर – नगरसोल गाडी औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. पार्थ पवार ‘वेलकम टु कोरेगाव’, शिवसेनेच्या आमदाराचं पवारांना आव्हान? नऊ गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर नांदेड ते अमृतसर गाडी तीन घंटे उशिरा आणि नांदेड ते मुंबई गाडी तीन घंटे उशिरा, नगरसोल – नरसापुर गाडी तीन तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मुंबई-नांदेड आणि अमृतसर – नांदेड गाडीचा मार्ग बदलण्यात आला असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल…
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील दौलताबाद रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू गाडीचे पाच डब्बे रेल्वे रुळावरुन कोसळल्यामुळे नांदेड विभागाचे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. डब्बे उचलण्यासाठी पूर्णा आणि मनमाड येथून क्रेन बोलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोसळलेले डब्बे हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.