मुंबई: सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गृहखात्याच्या कारभारावरून ही नाराजी असली तरी अद्याप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर तरी सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात (Marathi Bhasha Bhavan) याचे प्रत्यंततर आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांसारख सडपातळ असायला पाहिजे, स्मार्ट राहायला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.
राऊतसाहेब, काळजी नको, जरुर सुधारणा करु, वळसे पाटलांचा संजय राऊतांना शब्द
या कार्यक्रमात अजित पवार यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना फिटनेसच्या मुद्द्यावरून कानपिचक्या दिल्या. पोलिसांची शारीरिक क्षमता चांगली असायला हवी. या कारणामुळे पोलिसांची बदनामी व्हायला नको. पोलीस शिपायांकडे पाहिल्यावर अनेकदा मनात विचार येतो की, उद्या एखाद्या गुन्हेगाराच्या पाठी पळायचं झालं तर यांना पळता येईल का? एवढी शंका येण्याइतपत काही पोलीस कर्मचाऱ्यांची पोटं सुटलेली असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहा. ते कसे सडपातळ दिसतात, आमची तरी पोटं सुटलेली आहेत. पण पोलिसांनी स्मार्ट असलं पाहिजे. जेणेकरून गुन्हेगारांवर वचक राहील, असे अजित पवार यांनी म्हटले.
राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील, आधीच म्हटलं होतं : चंद्रकांत पाटील

मराठी भाषेवर आक्रमण खपवून घेणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबईतील भाषा भवनाचे भूमिपूजन आज शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जवाहर बालभवन चर्नीरोड येथे पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेवर आक्रमण झालेले खपवून घेणार नाही, असे म्हटले. मराठी भाषेबद्दल बोलण्यापेक्षा मराठी भाषेमध्ये बोला. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपल्याला पर्वा नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here