Prabhakar Sail | प्रभाकर साईल याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल याच्या खुलाशामुळे नवा ट्विस्ट आला होता. साईलचा मृत्यू संशयास्पद

हायलाइट्स:
- पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात काही नवा खुलासा होणार का
- प्रभाकर साईलला शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटका आला
आता पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात काही नवा खुलासा होणार का, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. प्रभाकर साईलला शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रभाकर साईल याचा मृत्यू तुर्तास नैसर्गिक वाटत असला तरी त्याच्या निधनामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल याच्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती.
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) अटक केली होती. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अन्य आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा पंचनामा केला होता. त्यावेळी प्रभाकर साईल हा त्याठिकाणी पंच म्हणून उपस्थित होता. मात्र, नंतरच्या काळात प्रभाकर साईल याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आर्यन खान याला गोवण्यात आले. आर्यन खान याला सोडवण्यासाठी किरण गोसावी याने शाहरुख खान याच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोपही प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता. प्रभाकर साईल याच्या आरोपानंतर एनसीबीच्या कारवाईसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : hm dilip walse patil order probe in prabhakar sail death case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network