मुंबई: मारहाण झालेला गेली तीन वर्ष माझ्याविरोधात घाणेरडे लिखाण करत आहे. त्याकडे मी वारंवार दुर्लक्ष केले. त्याला झालेल्या मारहाणीचं मला सोशल मीडियावरूनच समजलं, असं सांगतानाच राज्यात अनेकजण महत्त्वाच्या नेत्यांबाबत घाणेरडे लिखाण करतात. त्यांचं चारित्र्यहनन करतात. अशा संघ विचाराच्या कार्यकर्त्यांची आणि संघ विचाराच्या या अभियंत्याची जबाबदारी भाजपने घ्यावी, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर अनंत कारमुसे या अभियंत्याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. त्यामुळे भाजपने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आव्हाड यांनी अखेर मौन सोडत भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत या अभियंत्याचे कारनामेही जाहीर केले आहेत. हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत असतो. माझ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्या अनेकदा लक्षात आणून दिली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. खरे तर तो केव्हाच गजाआड जायला हवा होता. पण मीच त्याकडे दुर्लक्ष केलं. गेल्या २४ तासांपासून मी माझ्या मतदारसंघात आणि सोलापूरमध्ये व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं, असं सांगत या अभियंत्याला मारहाण झाली तेव्हा आपण त्या ठिकाणी नव्हतो, असंच त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मी तत्वत: अहिंसावादी आहे. मात्र अभियंता अनंत कारमुसे हा संघाचा किंवा भाजपचा कार्यकर्ता असावा. त्याच्या फेसबुक पोस्ट वाचल्या तर दिसून येईल. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या बदनामी करणाऱ्या अश्लील पोस्ट त्याने टाकल्या आहेत. कुणाचेही चारित्र्यहनन करणे हे खूनाच्या गुन्ह्यासारखेच असते. त्यामुळे भाजपने त्याची जबाबदारी घ्यावी, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पोलीस आयुक्तांकडे तक्रार

दरम्यान, आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी अनंत कारमुसे आणि सुनील राजेपवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही तक्रारीचा मेल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्या स्नेहल कांबळे यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here