काही दिवसांपूर्वी उर्फीचं एका वाॅचमनबरोबर भांडण झालं होतं. तो मुद्दा घेऊन कश्मिरानं उर्फीची थट्टा करत म्हटलं, मी उर्फीला ओळखते. कारण ती इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. पण ही तीच मुलगी ना, जिला वाॅचमननं बिल्डिंगमध्ये यायला मनाई केली होती. साॅरी साॅरी रस्त्यावर उभं राहायला मना केलं होतं. मला तिच्यासाठी वाईट वाटलं.
या कारणामुळे अजूनही प्रियांका आणि निकनं लेकीचं केलं नाही बारसं
उर्फीला कश्मिरा म्हणाली अनाडी
कश्मिरानं उर्फीला अशिक्षित, अनाडी असंही म्हटलंय. ती म्हणते, ‘ म्हणून म्हणते बेटी बचाओ,बेटी पढाओ. शिक्षण झालं असतं, तर कळलं असतं मी कोण आहे ते. हे सगळं करायची गरजच नसती पडली.’
विमानतळावर तिकीट घेऊन जा
उर्फीची थट्टा करत कश्मिरा म्हणाली, ‘मी एक सुचवते. विमानतळावर जाताना तिकीट घेऊन जा. फक्त उभं राहून फोटो नको काढूस. फोटो काढायचे, मग गाडीत येऊन बसायचं, हे बरं दिसत नाही.’
कतरिना- विकीने शेअर केले NO WI-FI व्हेकेशन Photos, चाहते म्हणाले…
राणी मुखर्जी प्रसिद्ध नाही का?
कश्मिरानं राणी मुखर्जीचं उदाहरण दिलं. ती म्हणाली, ‘ तिचं बरोबर आहे. भारतात अनेकांकडे फोन नाही, इन्स्टाग्राम तर दूरच राहिलं. ते मला ओळखतात. मी सिनेमात काम करते ना. आता राणी मुखर्जी इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध नाही. मग ती काय प्रसिद्ध नाही?’
