मुंबई :जॉन अब्राहम त्याच्या सिनेमातील अॅक्शन सीन स्टंटमनची मदत न घेता स्वतःच करतो. अलिकडे एका मुलाखतीमध्ये जॉननं त्याच्या सिनेमातील स्टंटबद्दल सांगितलं. त्याचवेळी सिनेमात स्टंट करताना त्याच्या कसं जीवावर बेतलं होतं याचाही खुलासा केला आहे.

काय म्हणाला जॉन?

जॉननं मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘अनेकदा सिनेमातील काही जीवघेणे सीन मी स्वत: केले आहेत. मला आठवतं की ‘फोर्स २’ या सिनेमात एक स्टंट करताना माझ्या पायाचा गुडघा दुखावला गेला होता. त्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाल्या. माझ्या उजव्या पायाला गँगरीनं झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी तो पाय कापावा लागण्याची शक्यता देखील वर्तवली होती. त्यावर त्यांना मी सांगितलं की, कृपा करून तुम्ही असं काही करू नका. माझा पाय कापू नका. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर राजेश मनियार यांनी शर्थीचे प्रयत्न करून माझा पाय वाचवला.’

KBC 14 :सज्ज व्हा बिग बींना भेटण्यासाठी अन् खेळण्यासाठी;केबीसी १४ च्या रजिस्ट्रेशनची तारीख जाहीर

जाॅन अब्राहम

जॉननं मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘ही गोष्ट जवळपास सात वर्षांपूर्वीची होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. आज मी चालत आहे, धावत आहे. इतकंच नाही तर सिनेमातही स्टंट करत आहे. इतकंच नाही तर आधीपेक्षा मी जास्त चपळ झालो आहे. मला अॅक्शन सीन करायला आवडतात. जेव्हा मला ब्रेक घ्यावासा वाटतो तेव्हा मी घेतो आणि काही तरी वेगळं करतो. परंतु मी कायमच अॅक्शन करणं मिस करतो आणि मी परत इथंच येतो.’ त्यानं या मुलाखतीमध्ये पुढं असंही सांगितलं की, ‘सिनेमात अॅक्शन करत असताना हिरोनं कुठं थांबायचं हे देखील समजलं पाहिजे. स्टंट सीन करताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण एकाच वेळी पाच लोकांना तुम्ही सामोरं जाऊ शकत नाही. हे स्टंट करताना तुम्हाला दुखापत होऊ शकते याचीही जाणीव ठेवायला हवी.’

Rajkummar Rao चं पॅनकार्ड गेलं चोरीला; चोरट्यानं कमी केलं अभिनेत्याचं रेटिंग

जॉननं ‘ढिशूम’ सिनेमाच्या सेटवरचा एक अॅक्शन सीनबद्दल सांगितलं की,’त्या सिनेमात हेलिकॉप्टरच्या बाहेर मला लटकायचं होतं. हा अतिशय खतरनाक स्टंट होता. हा सीन करताना मी काहीसा चिंतीत होतो. कारण या सीनमध्ये वरुण माझ्याबरोबर होता. त्याचा भाऊ आणि आमच्या सिनेमाचा दिग्दर्शक रोहित माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, जॉन सावध राहून हे सीन कर. वरुणला सांभाळून घे. या स्टंटमध्ये मला आणि वरुणला हेलिकॉप्टरच्या बाहेर लटकायचं होतं. हेलिकॉप्टर वेगानं उडत होतं. हा सीन खूपच भीतीदायक होता. परंतु त्या स्थितीत मला पूर्णपणे सावधगिरी बाळगून अत्यंत सुरळीतपणे हा सीन करायचा होता.’

जाॅन अब्राहम

जॉननं मुलाखतीमध्ये पुढे असंही सांगितलं की, त्याच्या ‘अटॅक’ या आगामी सिनेमाचा सिक्वेल जर करायचा असेल तर मी त्यात दोन मोठ्या अभिनेत्यांना त्यात नक्की घेईन. त्यानं सांगितलं की, ‘जर मला अटॅकचा सिक्वेल करायचा झाला तर मी त्यात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांना नक्की घेईन. कारण हे दोघंजण उत्तम स्टंट सीन करतात. जर त्यांना घेऊन हा सिनेमा केला तर तो अत्यंत जबरदस्त होईल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here