Ajit Pawar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले असले तरी हे वादळ अद्याप शमलेले नाही. अजित पवार यांनी यासंदर्भात भाष्य केले.

हायलाइट्स:
- गृहमंत्रीपद शिवसेनेला देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालीच नाही
- अशा बातम्या देण्यामागे कोण आहे, हे आम्हाला तरी कळू दे
यावेळी अजित पवार यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रालयासंदर्भात खरंच चर्चा सुरु आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी म्हटले की, तसं काहीही नाही. आम्हालाच आश्चर्य वाटतंय की, कोण अशा बातम्या देत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. मला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी कुठेच दिसत नाही. मी रोज कामात असतो. पण मला अजून नाराजी असल्याचं कुठेही जाणवलं नाही. त्यामुळे या बातम्या कोण पसरवतंय, हे माहिती नाही. काहीजण वेगळ्या बातम्या देऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
गृहमंत्रीपद शिवसेनेला देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालीच नाही. त्यामुळे अशा बातम्या देण्यामागे कोण आहे, हे आम्हाला तरी कळू दे. दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. पण नेत्यांमध्ये अशा चर्चा होत राहणार. काही प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी या चर्चा होत असतात, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रचंड बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक व्यासपीठांवर एकत्र दिसून आले. आज सकाळपासून हे दोन्ही नेते एकापाठोपाठ कार्यक्रमांना एकत्रच हजेरी लावत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात जुगलबंदी रंगल्याचेही पाहायला मिळाले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुकही केले. या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीत कोणताही दरी निर्माण झालेली नाही, हा संदेश देऊ पाहत आहेत का, असाही अंदाज बांधला जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : dcm ajit pawar on speculation about shiv sena wants dilip walse patil home ministry
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network