Raj Thackeray | माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, तुम्ही ज्या ईडी आणि आयकर खात्याच्या धाडी टाकत आहात, त्यापेक्षा या झोपडट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाका.

हायलाइट्स:
- राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील आपल्या भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांवर सडकून टीका केली
- उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेत जाऊ नका, हे प्रथम आपल्या कुटुंबाला सांगावे
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील आपल्या भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांवर सडकून टीका केली. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईला शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपची केलेली फसवणूक कारणीभूत आहे, हे राज ठाकरे यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री विधानसभेत ठणकावून सांगत होते की, जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर त्याआधी मला अटक करा. पण उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेत जाऊ नका, हे प्रथम आपल्या कुटुंबाला सांगावे. हे सगळे लोक महानगरपालिकेच्या सर्व पैशांचे व्यवहार बघतात. ईडीची नोटीस मलाही आली होती, पण मी चौकशीला सामोरा गेलो ना? यांना चार महिन्यांपूर्वी ईडीची नोटीस आली आहे. तरीही हे अजून चौकशीला गेलेले नाहीत. आता ईडीने संपत्ती जप्त करायला सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांचा भाजपविरोधा मावळला?
आजच्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी भाजप पक्षावर एकदाही फार कठोर टीका केली नाही. उलट राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली याविषयी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील सध्याच्या गलिच्छ राजकारणाला राज ठाकरे यांनी सर्वस्वी महाविकास आघाडीला जबाबदार धरले. तसेच राज ठाकरे यांनी अत्यंत प्रखरपणे हिंदुत्वाच्या भूमिकेचा पुरस्कार केला. त्यामुळे राज ठाकरे यांचे आजचे भाषण अनेक अर्थांनी लक्षणीय ठरले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : raj thackeray slams shivsena over politicizing ed and it raids issue indirectly backing bjp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network