मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला काल पनवेलनजीक अपघात झाल्याची घटना घडली होती. मलायकाच्या कारच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटून तीन-चार गाड्यांना मलायकाच्या गाडीने धडक दिली. या घटनेत मलायका हिच्या डोक्याला दुखापत झाली असून, तिला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं.

मलायकाला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज तिच्या तब्येतीविषयी नवीन माहिती समोर आली आहे. मलायकाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं समजतं. बहिण अमृता अरोरा हिनं देखील मलायकाच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. पहिल्यापेक्षा तिची तब्येत आता बरी असल्याचं तिनं म्हटलं आहे.

मनसैनिकांची बस आणि मलायका अरोराच्या रेंज रोव्हरचा अपघात; एक्सप्रेस हायवेवर दुर्घटना

मलायकाच्या अपघतानंतर तिचे चाहते चिंतेत होते. सोशल मीडियावर तिच्या तब्येतीविषयी प्रश्न विचारत होते. परंतु आता तिची तब्येत बरी असून लवकरच ती घरी परतणार आहे.

कसा झाला अपघात?

मुबंई-पुणे एक्सप्रेसवर अपघातात मलायका अरोरा जखमी झाली. बोरघाटात दुपारच्या सुमारास मुबंईकडं जाताना तीन ते चार वाहनांना धडक झाल्यानं हा अपघात झाला. यानंतर मलायकाला मुबंई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला दुखापात होऊन चार टाकेही पडलं आहेत. या अपघातात ह्युडांई कार, रेंज रोव्हर, एक मनसेच्या कार्यकर्त्यांची मुबंई इथं जाणारी बस ही वाहनं क्षतीग्रस्त झाली.

मलायका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here