मुंबई: सनी लिओनीनं सध्या प्रादेशिक चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत दोन ते तीन चित्रपटांचं काम ती करत आहे. लवकरच ती एका मराठी चित्रपटातही दिसणार असल्याचं कळतंय.
‘शांताबाई’ या संजय लोंढे यांच्या गाण्याचं रिक्रिएशन नितीन सावंत यांनी त्यांच्या आगामी ‘आमदार निवास’ या चित्रपटासाठी केलं आहे. संजीवकुमार राठोड या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या गाण्यात सनी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या गाण्यात सनीसोबत सयाजी शिंदे आणि रोहित चौधरी हे कलाकारही दिसणार आहेत. सनीच्या नृत्याचे चाहते या गाण्याची आतुरतेनं वाट पाहतील एवढं नक्की.