दारूच्या नशेत राडा घालणं जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला महागात पडणार आहे. शिक्षकाच्या नोकरीवरच गंडांतर येण्याची शक्यता आहे. याचं कारण आहे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला एक रिपोर्ट.

 

aurangabad news drunk zp teacher aurangabad gramin police
दारूच्या नशेत ‘त्या’ शिक्षकाचा राडा; आता थेट नोकरीवरच टांगती तलवार
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकाने दोन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत तुफान राडा घातला होता. राडा आता शिक्षकाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या याच कृत्याने त्याची नोकरी जाण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी या शिक्षकाने घातलेल्या राड्याचा रिपोर्ट औरंगाबाद जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवला आहे. आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

तारू पिंपळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले अशोक जिजाऊ पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास बिडकीन येथे दारू पिऊन दारूच्या दुकानात गोंधळ घातला. त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यावर पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांना सुद्धा शिवीगाळ करायला सुरवात केली. दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थितीत असलेल्या महिला पोलिसांना सुद्धा पाटील यांनी शिवीगाळ करत गुन्हा का दाखल करत नाही म्हणून गोंधळ घातला.

त्यानंतर पोलिसांनी या सर्व घटनेची नोंद पोलीस ठाण्याच्या डायरीत घेतली. या घटनेचा रिपोर्ट औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, झेडपी सीईओ निलेश गटणे आणि शिक्षण अधिकारी एम. के. देशमुख यांच्याकडे पाठवला आहे. तसंच अशोक पाटील यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पाटील यांची नोकरी धोक्यात आली आहे. प्रशासन आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : aurangabad news drunk teacher aurangabad gramin police
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here