मुंबई : अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर मंत्री यांच्यावर सोशल मीडियावर अर्वाच्च्य भाषेत टीका होत आहे. जितेंद्र आव्हाडांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी आम्ही तुमचा दाभोळकर करू, अशा धमक्या त्यांना सोशल मीडियातून दिल्या जात आहेत. दुसरीकडे कुणाचेही चारित्र्यहनन करणे हे खूनाच्या गुन्ह्यासारखेच असते. त्यामुळे भाजपने त्याची जबाबदारी घ्यावी, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काही सोशल मीडिया युझर्सकडून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही खालच्या भाषेत शिवीगाळ केली जात आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याच नावाने अकाऊंट तयार करुन त्यांना शिवीगाळ केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी नुकतीच भाजपने केली होती.

५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता देशातील नागरिकांनी घरातील वीज घालवून दिवे किंवा मोबाइल टॉर्च नऊ मिनिटे प्रकाशमान करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आव्हाड यांनी यावर टीका करणारी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे (४०, रा. आनंदनगर, घोडबंदर रोड) यांनी आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती.

फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर आपल्याला बेदम मारहाण झाली. मारहाणीची घटना आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात घडल्याची तक्रार सदर इंजिनीअरने पोलिस ठाण्यात दाखल केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सिव्हिल इंजिनीअरचे आरोप फेटाळून लावत माझ्या बंगल्यात असा कोणताही प्रकार घडला नाही, त्यावेळी मी उपस्थित नव्हतो, असे स्पष्ट केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here