मुंबई :रणबीर कपूर नेहमीच मीडियापासून दूर राहू इच्छितो. पण सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तो बोलतो, तेव्हा धक्कादायक विधानं तयार होतात. अगदी त्याला निकोटिनचं व्यसन होतं, तिथपासून मैत्रिणीची केलेली फसवणूक किंवा आईवडिलांच्या वैवाहिक जीवनातले वाद सगळं काही तो बिंधास्तपणे बोलून टाकतो. त्यामुळे त्याची विधानं ही हेडलाइन्स बनतात.

रणबीरच्या संजू सिनेमातली भूमिका सगळ्यांना आवडली. तिचं कौतुकही झालं. संजय दत्तचं ड्रगचं व्यसन त्यानं आपल्या अभिनयानं चांगलं उभं केलं होतं. एका मासिकाला दिलेल्या मुलीाखतीत त्यानं त्याला स्वत:ला १५ वर्षांपासून निकोटिनचं व्यसन असल्याचं सांगितलं. रणबीर म्हणाला की चार महिने त्यानं सिगारेट सोडली होती. पण त्याचं व्यसन इतकं आहे, की तो सिगारेटशिवाय राहू शकत नाही. रणबीर अगदी आडपडदा न ठेवता म्हणाला होता.

रणबीर कपूर

काही सिनेमेच केलेला रणबीर ऋषी कपूर आणि नितू सिंग यांच्या भांडणाबद्दलही सांगतो. २०११ मध्ये मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘ही भांडणं अनेकदा वाईट पद्धतीची व्हायची. मी मग पायरीवर बसून राहायचो, दोन्ही गुडघ्यात मान खुपसून, पहाटे ५ किंवा ६ वाजेपर्यंत. त्या दोघांमध्ये तणाव अनेक वर्ष होता. मी तिथे असायचो. याचा आमच्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून आई प्रयत्न करायची. ती आमच्याशी मोकळेपणे बोलायची. पण प्रेम म्हणजे फक्त गुलाबाची फुलं वगैरे काही नसतं. तो एक भ्रम आहे. मी स्त्री-पुरुषांमधली तणावाची नाती पाहिली आहेत.’

अभिनेत्यानं आपण दीपिका पदुकोणला फसवल्याची कबुलीही दिली. तो एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘ माझा असमंजसपणा, कमी अनुभव, मोहाला बळी पडणं यामुळे मी रिलेशनशिप गमावलं. ‘ अनेकींबरोबर रोमँटिक नाती ठेवल्यानंतर सरते शेवटी तो आलिया भट्टच्या प्रेमात पडला.’

कपूर कुटुंब

एका गोष्टीची बाकी त्यानं कबुली दिली. रणबीर १५ वर्षांचा असताना त्याची व्हर्जिनिटी संपली. त्या वयात त्यानं शारीरिक संबंध ठेवला होता.

आताही त्यानं रणधीर कपूरला डिमेन्शिया असल्याचं सांगितलं. शर्माजी नमकीन पाहिल्यानंतर रणधीर यांनी ऋषीला फोन लाव असं सांगितलं होतं. यावर स्वत: रणधीर कपूर म्हणाले, ‘ असं काही झालं नाही. मला फक्त काही महिन्यांपूर्वी कोविड झालेला. आता मी एकदम तंदुरुस्त आहे. रणबीर काहीही सांगेल. त्याची मर्जी. मी व्यवस्थित आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here