वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. रविवारी सकाळी हा गोळीबार झाला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Firing In America Latest)

मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया राज्याची राजधानी असलेल्या सॅक्रामेंटोमध्ये एका गजबजलेल्या भागात अज्ञात व्यक्तींनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने सहा जणांनी जागीच आपले प्राण गमावले, तर इतर नऊ जण जखमी झाले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रस्त्यावरून लोक धावताना दिसत आहेत, तसंच गोळीबाराचा आवाजही येत आहे.

लंडनमध्ये नवाझ शरीफ यांच्या कार्यालयावर पुन्हा हल्ला; इम्रान खान समर्थकांवर आरोप

गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिल्याने कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये काही लोक एकमेकांचा गळा दाबताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलीस कर्मचाऱ्याचा ४ दिवसांपूर्वीच झाला होता मृत्यू

अमेरिकेत चार दिवसांपूर्वीही एक हिंसक घटना घडली होती. कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुरुवारी गोळीबारात मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here