देशात काय आहे करोना प्रादुर्भावाची स्थिती?
करोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने भारतातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ५९७ इतकी कमी झाली आहे. करोनामुळे मागील २४ तासांत १३ जणांनी आपला जीव गमावला आहे.
लसीकरणात देशाने घेतली आघाडी
देशव्यापी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारी २०२१ पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर या लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यात आल्याने लस घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ३ एप्रिल २०२२ च्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने १८४ कोटी ६६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी १६ मार्च २०२२ रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत १.८५ कोटीहून अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.