अभिनेता प्रसाद ओक सध्या त्यानं दिग्दर्शित केलेल्या ‘चंद्रमुखी’ या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. त्याचबरोबर प्रसादनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निळूभाऊंच्या आयुष्यावर सिनेमा करत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना प्रसादनं एक प्रदीर्घ अशी भावुक पोस्टही शेअर केली आहे.
Video: करण जोहरने गायलं शाहरुख खानचं गाणं, परिणीतीला असह्य झालं ऐकणं
प्रसाद ओकची पोस्ट
प्रसाद ओकनं निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या नाटकाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. प्रसादनं इन्स्टाग्रामवर निळूभाऊंचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,’ निळूभाऊ…आज तुमचा वाढदिवस…!!! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं. अनुभवता आलं. तुमच्याकडून बरंच काही शिकलो. तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन “गुरू” च मानलं. तुमचा आशिर्वाद म्हणूनच की काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली “गुरुदक्षिणा” असेल…!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ…!!!’
ही पोस्ट शेअर करताना प्रसादनं हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, त्यामध्ये कोण कोण कलाकार असतील, निळूभाऊंची भूमिका कोण साकारणार याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, प्रसादची ही पोस्ट निळू फुले यांच्या कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी देखील शेअर केली आहे.
Video : Lock Upp मध्ये जीशान खानला पायल रोहतगी म्हणाली दहशतवादी
अभिनेत्यापलिकडचं व्यक्तिमत्त्व उलगडणार

निळू फुले यांची कन्या गार्गी फुले थत्ते यांनी काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘माझे वडील खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांचा ‘बाई वाड्यावर या’ या संवादामुळे ते खूपच लोकप्रिय झाले होते. अभिनेत्यापलिकडे त्यांनी खूप समाजकार्यही केले आहे. ते अभ्यासू व्यक्ती होते. निळूभाऊ एक माणूस म्हणून ते कसे होते हे आजच्या तरुण पिढीला कळावं अशी माझी इच्छा आहे.’ निळू फुले यांनी २५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच रंगभूमीवरही त्यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं.
प्रसादच्या पोस्टवर भरभरून कमेन्ट
दरम्यान, प्रसाद आणि गार्गीच्या यांनी या बायोपिकची घोषणा करणाऱ्या पोस्टवर चाहत्यांबरोबरच अनेक कलाकार मंडळींनी कॉमेन्ट केल्या आहेत त्यामध्ये आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मंजिरी ओक, अमृता खानविलकर, समिधा गुरू, आनंदी जोशी यांचा समावेश आहे.