नांदेड : देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना हा अपघात घडला आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे वीजेच्या खांबावर काम करत असताना वीज प्रवाह सुरू झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
खळबळजनक! ऑफिसमधून सगळे जाताच कॅशियरचं टोकाचं पाऊल, १० दिवसांवर होतं लग्न…
यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून या घटनेचा पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. पण काम करत असताना अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.