बुलडाणा: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२ झाली आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील ‘मरकज’हून बुलडाण्यात आलेल्या चौघांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही व्यक्तींचे रिपोर्ट नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात शेगाव व सिंदखेड राजा येथील दोघांचा समावेश होता. त्यांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आज त्यात चिखलीतील आणखी एकाची भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ जणांच्या चाचणी अहवालाची प्रतीक्षा होती. त्यातील १२ अहवाल बुधवारी पहाटे मिळाले. त्यात एक पॉझिटिव्ह तर ११ निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद्र पंडित यांनी दिली आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. जिल्हा मुख्यालयालाकडून करोनाचे लोन आता तालुका व ग्रामीण भागात पोहोचले आहे. २८ मार्च रोजी बुलडाणा येथील मिर्झानगर परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. २९ मार्च रोजी त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर मृताच्या संपर्कातील चार जण पॉझिटिव्ह निघाल्याने चिंता वाढली होती. मरकजहून परतलेल्यांच्या संपर्कात आल्यामुळं आणखी सात रुग्ण वाढले होते.

वाचा:

समूह संसर्गाचा धोका असल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. सध्या क्लस्टर योजनेनुसार बुलडाणा, चिखली, दे. राजा, खामगाव, शेगाव, आणि आता सी. राजा येथे प्रशासन काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला निवासी परिसर सील करण्यात आला आहे. शिवाय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

बुलडाणा: ५ (एक मृत)
चिखली : ३
दे. राजा: १
सी. राजा : १
खामगाव: १
शेगाव : १

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here