ज्या महिला पालक पुष्पा चौधरी यांच्यासोबत या शाळेतील बाऊन्सर्सने धक्काबुक्की केली त्यांनी आपली आपबिती सांगताना संताप व्यक्त केला आहे. “मी माझ्या मुलाला शाळेत सोडायला आणि फी भारयला गेले होते. मात्र, शाळा प्रशासन फी घेण्यास तयार नव्हते आणि मुलालाही शाळेत घेण्यास तयार नव्हते. उलट मला शाळेच्या बाहेर काढण्यास बाऊन्सर्सच्या माध्यमातून धक्काबुक्की करण्यात करण्यात आली.”
दरम्यान, पुण्यात खाजगी शाळेत बाऊन्सर्सकडून सातत्याने पालकांना मारहाण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराच्या टोपल्या दाखवण्यात येत असल्याचे पालक म्हणत आहेत. मुळात शिक्षण संस्थांना खासगी बाऊन्सर्स ठेवण्याची गरजच काय आहे ?, यांचं काय सावकारकीचं धोरण आहे का ?, आता आमचा ना सरकारवर विश्वास आहे ना पोलिसांवर त्यामुळे आम्हाला देखील आता आमच्या संरक्षणासाठी खासगी बाऊन्सर्स ठेवावे लागतील.” अशी प्रतिक्रिया पालक विजय धुमाळ यांनी दिली आहे.
दरम्यान, शिक्षणाच्या माहेरघरातच अशा लाजिरवाण्या आणि संतापजनक घटना घडत असतील तर याकडे गंभीरतेने पाहणे तितकेच गरजेचे आहे. शिक्षण मंत्री बाउन्सर न ठेवण्याचे आदेश देतात पण शाळा प्रशासन मंत्र्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवतात. अशात खासगी शाळांचा मुजोरपणा ठोकून काढण्यात शासन आणि प्रशासन कमी पडत हे तितकंच खरं.
रिपब्लिकन असताना भाजपला राज ठाकरेंची गरज नाही, ते परवडणारेही नाही;