सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीतावेळी टेलर त्याच्या मुलांसोबत होता. टेलरने आधीच जाहीर केले होते की तो नेदरर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याने जानेवारी महिन्यात अखेरची कसोटी बांगलादेशविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यात त्याने विकेट देखील मिळवली होती. न्यूझीलंडच्या या दिग्गज खेळाडूने वनडे करिअरमध्ये २३६ सामने खेळले असून त्यात त्याने ८ हजार ६०७ धावा केल्या आहे. त्याने २००६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत पदार्पण केले. वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम टेलरच्या नावावर आहे. वनडेत सर्वाधिक शतक आणि अर्धशतकाचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. टेलरने २१ शतक आणि ५१ अर्धशतक केली आहेत. टेलरने कसोटीत ७ हजार ५८४ धावा केल्या आहेत.
वाचा- IPLमध्ये याआधी असे कधीच घडले नाही; ज्यांनी ९ विजेतेपद मिळवली पाहा
गोलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या टेलरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरच्या लढतीत खास कामगिरी करता आली नाही. तो फक्त १४ धावांवर बाद झाला. पण गेल्या १६ वर्षात त्याने न्यूझीलंडकडून अनेक शानदार खेळी केल्या आहेत. टेलरने आयपीएलमधील ५५ सामन्यात १२४च्या स्ट्राईक रेटने १ हजार १७ धावा केल्या आहेत. ८१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
वाचा-IPLमध्ये नवे नियम: असा षटकार मारल्यास ८ धावा तर ३ निर्धाव चेंडूवर विकेट; अजब मागणीची चर्चा
पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या संघात टेलरचा समावेश होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने तेव्हा भारताचा पराभव केला होता. टेलरने वनडेत ७२ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. नाबाद १८१ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये तीनही फॉर्मेटमध्ये प्रत्येकी १०० सामने खेळणारा टेलर हा जगातील पहिला खेळाडू ठरला होता. टी-२० मध्ये त्याने १ शतक आणि ३२ अर्धशतक केली आहे. नाबाद १११ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २७ शतक आणि १२ हजार धावा केल्या आहेत. टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे.

Ross Taylor Last International Match