मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांच्या घरी आता लवकरच सनईचे सूर गुंजणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रणबीर आणि आलिया रिलेशनमध्ये आहेत. हे दोघे कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघं जण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे या दोघांचं लग्न कपूर हाऊसमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ई-टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार रणबीर आणि आलिया हे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. कपूर आणि भट कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आलियाचे आजोबा एन राजदान यांची तब्येत फारशी चांगली नाही. त्यांना आपल्या नातीचं लग्न बघायचं असल्याची इच्छा जाहीर केली आहे. आलियाच्या आजोबांना रणबीर खूप आवडतो.’

मलायकाच्या तब्येतीची चौकशी करायला घरी गेला अर्जुन कपूर, Video Viral

आलिया रणबीर

केव्हा होणार विवाहबद्ध?

आलिया आणि रणबीर यांचं लग्न कधी होणार याची माहिती देण्यासाठी मात्र सूत्रांनी टाळाटाळ केली आहे. त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या लग्नाची तारखी अद्याप ठरलेली नाही. परंतु सर्व काही आलबेल असलं तर आलिया आणि रणबीरचं लग्न १७ एप्रिल रोजी होऊ शकतं. अर्थात आलियाच्या आजोबांची प्रकृती पाहता ही तारीख पुढं-मागं होऊ शकते.

रणबीर आलिया

लग्न होणार या ठिकाणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार नाही. तर या दोघांचं लग्न मुंबईतच होणार आहे. आलिया-रणबीरचं लग्न एन्सेस्ट्रल हाऊस आरके हाऊसमध्ये होणार आहे. आरके हाऊसमध्ये रणबीरच्या आईवडिलांचं म्हणजे ऋषी आणि नीतू कपूर यांचं लग्न झालं होतं. दोघांचं लग्न अत्यंत खासगी पद्धतीनं होणार असून त्यात ४५० लोकांनाच निमंत्रित केलं जाणार आहे.

Photo- रमजानमध्ये उर्फी जावेदने घातली ट्युब ब्रा, चाहत्यांनी सणाची करून दिली

आलिया आणि रणबीरच्या कामाबद्दल सांगायचं तर ते लवकरच अयान मुखर्जी याच्या ब्रह्मास्त्र सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here