नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी लखनौ सुपर जायंट्सच्या धावसंख्येवर लगाम लावला आणि आपल्या पहिल्या विजयाचा पाया रचला. हैदराबादच्या संघाने सुरुवातीलाच लखनौचे तीन फलंदाज बाद करत त्यांची ३ बाद २६ अशी अवस्था केली होती. त्यानंतर कर्णधार लोकेश राहुल आणि दीपक हुडा यांनी अर्धशतके झळकावली खरी, पण तरीही लखनौला धावांचा मोठा डोंगर उभारता आला नाही. त्यामुळे त्यांंना हैदराबादपुढे विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवता आले.
हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार केन विल्यमसनचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. लखनैच्या संघाला क्विंटन डीकॉक रुपात पहिला धक्का बसला. हैदराबादचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने यावेळी डीकॉकला एका धावेवर बाद केले. त्यानंतर सुंदरने यावेळी लखनौच्या संघाला दुसरा धक्का दिला. पहिल्यांदा त्याने क्विंटन डीकॉकला बाद केेल होते, त्यानंतर आता त्याने इव्हिन लुईसला बाद केले. त्यामुळे लखनौची २ बाद १६ अशी स्थिती केली. त्यानंतर मनीष पांडे फलंदाजीला आला आणि त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण मनीषला यावेळी ११ धावा करता आल्या आणि लखनौच्या संघाची ३ बाद २६ अशी अवस्था झाली होती. त्यावेली लखनौचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही, असे चाहत्यांना वाटत होते. पण त्यावेळी लखनौचा कर्णधार लोकेश राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची पडझड थांबवली आणि त्यांच्या धावसंख्येची गाडी रुळावर आणली. राहुल सलामीला आला असला तरी चौथ्या स्थानावर फलंदाजीला आलेला दीपक यावेळी आक्रमक फटकेबाजी करत होता. कारण राहुलच्या आधीच हुडाने आपले अर्धशतक पूर्ण केले. हुडाने ३१ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावा पूर्ण केल्या. पण अर्धशतक झळकावल्यावर दीपकने फक्त एकाच धावेची भर घातली आणि तो बाद झाला. दीपक बाद झाल्यावर राहुलने चौकार लगावत आपले ३८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यावर राहुलने आक्रमकपणे फलंदाजी करण्यावर भर दिला. त्यामुळे अखरेच्या षटकांमध्ये राहुलने जास्त धावा वसूल केल्या. राहुलने यावेळी ५० चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६१ धावांची खेळी सााकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here