औरंगाबाद : दुचाकीस्वाराने हेल्मेट घातला नाही म्हणून त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. अनेकदा वाद घालणाऱ्या चालकाला पोलीस ठाण्यात सुद्धा नेण्यात येतं. पण औरंगाबादमध्ये हेल्मेट घालणाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलं जातं. आता तुम्ही म्हणाल हा काय नवीन प्रकार आहे. तर आधी बातमी पूर्ण वाचा म्हणजेच तुम्ही सुद्धा पोलिसांचं कौतुक केल्याशिवाय रहाणार नाही.

औरंगाबाद शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम पाळण्यासाठी अनेकदा नागरिकांना आवाहन केले जाते. मात्र तरीही मोठ्याप्रमाणात दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट वापरावे म्हणून औरंगाबाद शहर पोलिसांनी एक भन्नाट असा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची जिल्हाभरात चर्चा असून, नागरीक हेल्मेट सुद्धा घालत आहे.

मी वंशज, पण शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार छगन भुजबळ : संभाजीराजे छत्रपती
शहरातील प्रत्येक सिग्नलवर येणाऱ्या- जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून फोटो काढले जातात. ज्यातील हेल्मेट घातलेल्या आणि शिस्तप्रिय अशा ३०० ते ३५० नागरिकांच्या फोटोंची निवड केली जाते. त्यानंतर यातील १० दुचाकीस्वारांची सोडत पद्धतीने निवड केली जाते. निवड झालेल्या दुचाकीस्वारांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून गिफ्ट देऊन त्यांचे सत्कार केले जाते. सोमवारी या उपक्रमाची पहिली सोडत झाली, ज्यात निवड झालेल्या १० दुचाकीस्वारांचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

भन्नाट उपक्रम….

पोलिसांनी सुरू केलेल्या या भन्नाट उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.तर आपलाही पोलिसांकडून सत्कार व्हावा या भावनेने अनेक जण हेल्मेट घालत आहे. तर जे नियमित हेल्मेटचा वापर करतात त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पहिला राजीनामा पुण्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here