बेलाळे हे पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासह घराकडे परत निघाले होते. त्यावेळी पंढरपूरहून मोहोळकडे निघालेल्या एम एच १२ एफ झेड ७३७७ या ट्रकचालकाने सारोळे पाटी जवळील सह्याद्री ढाब्या समोर आपला ट्रक धोकादायक स्थितीत उभा करून धाब्यावर जेवण घेण्यासाठी गेला होता. यावेळी आपल्या कुटुंबासह निघालेले कॉन्स्टेबल दयानंद अण्णाराव बेलाळे, त्यांचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे त्यांची पत्नी स्वाती तर सचिन बेलाळे वय २२ आणि दिपाली दयानंद बेलाळे वय २५ व त्यांची दोन लहान मुले त्रिशा वय ८ वर्ष व श्लोक वय १ वर्ष हे सर्वजण आपल्या ओमनीकार क्रमांक एम एच १२ एन ई ४४८७ या कारने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दयानंद व त्याचा भाऊ सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामध्ये दोघांच्या पत्नी स्वाती व दीपाली व मुले त्रिशा व श्लोक हे सर्वजण गंभीर जखमी झाले. यांना खाजगी वाहनातून सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, कॉन्स्टेबल दयानंद यांच्या मृत्यूने मोहोळ पोलीस ठाणे व सोलापुर मुख्यालय यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.