मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे यांनी या भाषणात प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका घेताना केलेल्या वक्तव्यांमुळे अनेक नव्या वादांना तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोणीही कायदा किंवा संविधानापेक्षा मोठा नाही, याची जाणीव राज ठाकरे यांना करून देणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांच्या बोलण्यामुळे समाजातील एकीला तडा जाऊ शकतो. तसेच समाजात कोण वाईट आणि कोण चांगलं, अशी प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार राज ठाकरे यांना कोणी दिला? असा सवाल सचिन खरात यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे ऋतुप्रमाणे बदलतात; गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका


तसेच राज ठाकरे यांच्या समाजात तेढ पसरवणाऱ्या वक्तव्यांची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली पाहिजे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई झाली पाहिजे, असे मत सचिन खरात यांनी उपस्थित केले. यावर आता मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेना नेत्याकडून राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो शेअर, सोबत तिखट फेसबुक पोस्ट!

जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना एक विनंती केली होती. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना आताच काम लागलंय. कृपया महाराष्ट्र पेटवू नका, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते.राजसाहेब, महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनानंतर लोकांना आताच कामं लागली आहेत. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत. गॅस-पेट्रोल-डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय. याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत, असे ट्विट आव्हाड यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here