मुंबई : मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे ((Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरील आपल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला होता. भाजपच्या नेत्यांनीही राज ठाकरेंच्या या मागणीला सहमती दर्शवली आहे. असं असतानाच आता या मागणीवरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी (Abu Azmi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आझमी यांनी हिंदू सणांचा संदर्भ घेत त्यावेळी वाजवण्यात येणाऱ्या डीजेमुळेही ध्वनीप्रदूषण होते, हा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनीप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का?” असा सवाल अबु आझमी यांनी सोमवारी उपस्थित केला. “पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं देखील आझमी म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वासही आझमी यांनी व्यक्त केला.

‘राज ठाकरेंमुळे समाजाचं ऐक्य धोक्यात; राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई करा’
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिंदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. यावर देखील आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

“शिवाजी पार्क शांत भागात येतो. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करुन कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नाही,” असंही अबु आझमी म्हणाले.

MNS: राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुण्यातील पदाधिकारी नाराज; वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here