मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तर थेट कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाई केली जाणार का आणि पोलिसांना याबाबत काही आदेश दिले आहेत का, असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, ‘यासंदर्भात तपासून घेऊन पुढील निर्णय घेऊ. मात्र पोलिसांना दररोज आदेश देण्याची गरज नसते, त्यांना आपलं काम माहीत आहे. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आवश्यक ती कार्यवाही करतील.’

Vasant More: ‘मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावं, माझ्या प्रभागात मी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही’

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून भडकाऊ वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने योग्य नसून याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत.’

Abu Azmi: अबु आझमी म्हणतात, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावायला येणाऱ्यांना आम्ही….

पोलीस आयुक्तांच्या आरोपावर काय म्हणाले गृहमंत्री?

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल खात्यातील अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. पांडे यांनी जाहीररित्या केलेल्या आरोपांमुळे महसूल खात्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनीही पोलीस आयुक्तांची कृती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ‘जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये भूमाफिया हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना हाताशी धरून जागामालकांचा छळ करत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्ससारखे आहेत, तर कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार डिटोनेटरसारखे आहेत,’ असं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here