मुंबई : बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींमध्ये दिव्या भारती हिचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्या काळात प्रत्येक निर्मात्याला, दिग्दर्शकाला दिव्या भारतीनं आपल्या सिनेमात काम करावं असं वाटायचं. दिव्या भारतीनं अल्पावधीत जितकी प्रसिद्धी मिळवली तितकी प्रसिद्धी अन्य कोणत्याही अभिनेत्रीला मिळाली नाही. दिव्या भारतीला मिळालेलं यश क्रूर अशा नियतीला बघवलं नाही. १९९३ मध्ये दिव्या भारती हिचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या अकस्मिक मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना, बॉलिवूडला मोठा धक्का बसला. आजही चाहत्यांच्या मनात असं काय घडलं त्यामुळे दिव्या भारतीबाबत अशी दुर्घटना घडली, हा प्रश्न आहे. दिव्या भारतीच्या आई-वडिलांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लेकीच्या मृत्यूशी संबंधित काही गोष्टींचे खुलासे केले होते. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता.

दिव्या भारतीचे आईवडील

Legends of Ramayana : डिस्कव्हरीवर दर्शन देणार श्रीराम

दिव्यानं स्वतःला कधीच ओळखलं नाही

दिव्या भारतीच्या आईनं मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘दिव्यानं स्वतःला कधीच नीट ओळखलं नाही. तिचं स्थान कुठं आहे, याची तिला जाणीवच नव्हती. तिच्यावर लोक किती भरभरून प्रेम करतात, याची थोडी जरी माहिती असती तरी तिनं स्वतःची काळजी घेतली असती. इतकंच नाही तर ही दुर्घटना देखील टळली असती.’

माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही

दिव्याच्या निधनानंतर अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये तिनं आत्महत्या केल्याचं नमूद केलं होतं. परंतु मीता भारती यांनी सांगितलं की, ‘दिव्या कधीच आत्महत्या करू शकत नाही. ती असं करूच शकत नाही. तिचा तो स्वभावच नव्हता. पण त्याचबरोबर तिची हत्या देखील झाली नाही. कुणी तिला का मारेल?’

अजून एक प्रेमभंग, अनन्या पांडे- ईशान खट्टरचं ब्रेकअप!

इमारतीमधून पडून झाला मृत्यू

दिव्या भारती

५ एप्रिल १९९३ रोजी पाचव्या मजल्यावरून पडून दिव्या भारतीचं निधन झालं. त्यावेळी आलेल्या रिपोर्ट्सनुसार दिव्या भारती चेन्नईहून तिच्या सिनेमाचं चित्रीकरण संपवून परत मुंबईला आली होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्यावेळी ती वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर होती. तिची स्वयंपाकीण जेवण बनवत होती. दिव्या खिडकीत बसून तिला जेवणाच्या सूचना देत होती. अचानक तिचा हात सरकरला आणि ती ग्रील नसलेल्या खिडकीतून खाली पडली. या दुर्घटनेनंतर तातडीनं तिला कुपर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here