नवी दिल्ली : भाजपकडून आक्रमक टीका होत असताना महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मित्रपक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. शिवसेनेच्या खासदारांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे राज्यातील मंत्र्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. याबाबत संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे खासदार शिवसंवाद दौऱ्यानिमित्त विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते. या खासदारांनी चार दिवस राहून स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीचा आढावा घेतला. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत खासदारांकडून शिवसंवाद दौऱ्याबाबतचा अहवाल मांडला जाईल आणि ज्या संघटनात्मक त्रुटी आहेत, त्याची माहिती दिली जाईल. सरकार म्हणून सामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचावं लागेल. महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांनी इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही मदत केली पाहिजे. मात्र एखाद्या जिल्ह्यात एका पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतो, अशा तक्रारी कॉमन आहेत. त्यामुळे संबंधितांना आगामी काळात सूचना द्याव्या लागतील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis:’समृद्धी महामार्ग ही माझीच संकल्पना, काहीही केलंत तरी माझं नाव मिटवता येणार नाही’

‘यूपी-गोव्यात अद्याप भोंगे उतरवण्यात आले नाहीत’

मशिदीवरील भोंगे उतरवण्यात यावेत, अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांकडून आक्रमकपणे करण्यात येत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘देशातील भाजपशासित राज्यांमध्येही भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. गोव्यात गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, मात्र तिथेही मशिदीवरील भोंगे अजूनही आहेत, उत्तर प्रदेशमध्येही हीच स्थिती आहे,’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहेत.

दरम्यान, प्रशिक्षण आणि इतर कामासाठी राज्यातील विविध पक्षांचे ८० आमदार दिल्लीत आले आहेत. या आमदारांना आम्ही भोजनासाठी निमंत्रित केलं असल्याची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here