मुंबई :आयुष्याच्या प्रवासात कितीही अडथळे आले आणि परिस्थिती कितीही बिकट असली तरी कलेची जोपासना करत स्वतःच्या स्वप्नपूर्तीकडे अनेक जण वाटचाल करत असतात. अशाच आशयाची ‘तुझेच मी गीत गात आहे‘ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कोठारे बारा वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय.


गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून मांडण्यात आली आहे. वैदेही असं उर्मिला कोठारेच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारत आहे.

या भूमिकेबाबत उर्मिला सांगते की, ‘खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे’. तब्बल बारा वर्षांनंतर उर्मिला छोट्या पडद्यावर परतल्यामुळे तिची भूमिका पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये आणि मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.
उर्मिला कोठारे सांगतेय ‘एकदा काय झालं’ …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here