जळगाव : जळगाव जिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरु असताना अवचित काळु तायडे वय 46 रा.समतानगर यांचा सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अवचित काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असुन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. समता नगरातील रहिवासी अवचित तायडे हे मजुरी काम करतात. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डाव्या बाजूने पॅरालिसीस सारखा त्रास होत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी डॉक्टरांनी पाहिजे ते उपचार अवचित तायडे यांच्यावर करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी दिवसभर केवळ सलाइन लावून ठेवले तर रात्री ऑक्सिजन लावला. मात्र, ऑक्सिजनची नळीही मशीनला न लावता जमिनीवर पडलेली असल्याचं दिसलं. याबाबतचा व्हिडिओसुद्धा नातेवाईकांकडे आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक हॉस्पीटलमध्ये मेंदूचा डॉक्टर नसल्याचं उत्तर नातेवाईकांना दिलं. तसेच त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल असं सांगितलं. याचदरम्यान अवचित तायडे यांचा मृत्यू झाला.

आमची हत्या करण्याचा कट; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारवर गंभीर आरोप
नातेवाईक पोलिसांत तक्रार देणार

डॉक्टरांनी दिवसभर कुठलेही उपचार केले नाही तसेच लक्षही दिले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित तायडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत अवचित तायडे यांचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही अवचित तायडे यांच्या नातेवाईकांनी केली असून याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

ED action on Sanjay Raut: मोठी बातमी! ‘ईडी’कडून संजय राऊत यांची संपत्ती जप्त
संबंधितांवर कारवाई न झाल्यास जिल्हा रुग्णालयासमोर करणार तीव्र आंदोलन

ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिला आहे. मयत अवचित तायडे यांच्या पश्चात पत्नी शारदा , मुलगा राहुल तसेच विवाहित मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here