अहमदनगर : कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे. काल ( सोमवारी ) दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली असून तरुणाचे शोध कार्य अद्यापही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सध्या उन्हामुळे प्रचंड उकाडा वाढला असून नागरिक दिलासा मिळण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. ग्रामीण भागात तर तरुण वर्ग दुपारच्या सुमारास पाट, चारी, कॅनल अशा ठिकाणी पाण्यात पोहायला जातात. मात्र, कधीकधी हे सर्व जीवाशी बेतत असल्याच्या घटना ऐकायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडली आहे.

आजपासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार, पुण्यात मानाच्या गदेचे पूजन
राहाता तालुक्यातील लोणी येथे अमन रुबाबभाई खाटीक, वय वर्ष १८ राहणार शांतीनगर लोणी खुर्द, हा मित्रांसमवेत कॅनॉलवर फिरायला गेला होता. कॅनॉलच्या पाण्यात पोहत असलेल्या मित्राला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हात देत असतांना अमनचा पाय घसरून तो तोल गेल्याने वाहत्या पाण्यात पडला.

अमनला पोहता येत नसल्यामुळे तो कॅनॉलच्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली आहे. मित्रांनी बराच वेळ शोध घेतला मात्र अमन मिळून आला नाही. लोणी येथील नाशिक पुल येथे घटना घडल्याची माहिती लोणी पोलीसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अमनला रात्रभर शोधण्याचे प्रयत्न करूनउई तो दुसऱ्यादिवशी ( मंगळवारी ) दुपारपर्यंत मिळून आला नाही.

शिर्डी येथील बचाव कार्य टीम घटनास्थळी दाखल झाली असून अमनचे शोधकार्य सुरूच आहे. कॅनॉलची खोली जास्त असल्याने अमनच्या बाबतीत ठोस काही माहिती हाती लागलेली नाही. या घटनेमुळे लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली असून खाटीक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पण का? हेल्मेट न घालणाऱ्यांना नव्हे तर घालणाऱ्यांना पोलीस आयुक्तालायचं बोलावणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here