मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात आज मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याच्या आधी आरसीबीला एक मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज अद्याप साठी आरसीबी संघाशी जोडला गेला नाही. इतक नाही तर अजून एक आठवडा तरी तो आयपीएल खेळू शकणार नाही.

वाचा-

ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात हेजलवुड देखील होता. आयपीएल २०२२ मध्ये येण्याआधी त्याला ३ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागले. त्यामुळे हेजलवुड १२ एप्रिल रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. आयपीएलमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हेजलवुड पुढील काही दिवसात संघासोबत जोडला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंप्रमाणे तो पाकिस्तान दौऱ्यानंतर थेट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येणार नाही. हेजलवुडने वैयक्तीक कारणामुळे काही दिवसांची विश्रांती घेतली आहे.

वाचा-

दुसऱ्या बाजूला क्रिकेट ऑस्ट्रेलिया जारी केलेल्या नियमानुसार बोर्डाच्या करारात सहभागी असलेल्या खेळाडूंना ६ एप्रिलच्या आधी निवडीसाठी उपलब्ध होता येणार नाही. याचा अर्थ आरसीबीसाठी एका बाजूला ग्लेन मॅक्सवेल संघात दाखल झाल्याचा आनंद होणार असला तरी त्याला आज ५ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात भाग घेता येणार नाही.

वाचा-

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये जोश हेजलवुडला सर्वाधिक बोली लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्याला ७.७५ कोटींना खरेदी केले होते. गेल्या दोन हंगामात हेजलवुड चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here