पुणे : उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार करत निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज बाबुराव जाधव (34) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव(55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (35,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.
असा घडला सर्व प्रकार
तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. परत परत पैसै मागण्याच्या रागात गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.