उत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्सची सुरुवात समाधानकारक झाली होती. मधळ्या फळीतील फलंदाजांनी घात केला. पण कार्तिक आणि अहमद यांनी धमाकेदार फलंदाजी केली. अहमदने २६ चेंडूत ४५ तर कार्तिकने २३ चेंडूत ४४ धावा केल्या. ३ सामन्यातील राजस्थानचा हा पहिलाच पराभव ठरला, असे असले तरी गुणतक्त्यात ते पहिल्याच स्थानावर आहेत. तर विजय मिळवणारा आरसीबीची संघ सहाव्या स्थानावर आहे. ३ सामन्यात त्यांचे २ विजय आणि १ पराभवासह ४ गुण झालेत. गुणतक्त्यात राजस्थान, कोलकाता, गुजरात, पंजाब, लखनौ आणि आरसीबी या सहा संघांचे प्रत्येकी ४ गुण आहेत. मात्र नेट रन रेटच्या जोरावर राजस्थान अव्वल स्थानावर आहे. त्याचे नेट रनरेट प्लस १.२१८ इतके आहे.
वाचा- IPL मध्ये मोठा धक्का; महाग खेळाडू एका आठवड्यासाठी IPL मधून बाहेर
गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स सातव्या, मुंबई इंडियन्स आठव्या, चेन्नई सुपर किंग्ज नवव्या तर सनरायझर्स हैदराबाद अखेरच्या स्थानावर आहे. या तिनही संघांना अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
