सिंधुदूर्ग : राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण व गोवा या हवामान उप विभागामध्ये पुढील पाच दिवस म्हणजेच ६ एप्रिल ते १० एप्रिल तुरळक हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ते ७ तारखेला तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजेचा लखलखाट व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र मुबई यांनी दिला आहे. तर १० ते १६ कालावधी दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Alert : राज्यावर पुन्हा आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
यावेळी कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्शिअसने घट होईल तर किमान तापमानात काहीशी अंशतः वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अनुक्रमे ३३ ते ३४ व २३ ते २५ अंश सेल्सियस तापमान राहणार असून तापमान उष्ण, दमट व अंशतः ढगाळ वातावरण असेल.

या बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, भात, भुईमूग, कुळीथ, चवळी, वाल, भेंडी अशा भाजीपाल्यांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ६ आणि ७ तारखेला वीजेच्या कडकडासह वारा, पाऊस असल्याने पशुधन गुरे, शेळ्या, मेंढ्या झाडाखाली बांधू नयेत गोठ्यात बांधाव्या अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीराजेंचा मोठा निर्णय, खासदार निधीची अखेरची रक्कम ‘या’ कामासाठी देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here