नवी दिल्लीः आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. भाजप आज ४२वा वर्धापन दिन साजरा करत आहे. १९८० साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी भाजपची स्थापना केली.

जनसंघाला निवडणुकामधील पराभवासाठी कारणीभूत ठरवले गेले. त्यानंतर जनता पार्टीने दुहेरी सदस्यत्वाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ४ एप्रिल १९८०मध्ये एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी वाजपेयी आणि आडवाणी यांनी ५ आणि ६ एप्रिलला जनसंघाच्या रॅलीची घोषणा केली. जनता पार्टीच्या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणीने १७चा तडजोडीचा फॉर्म्युला फेटाळून लावला व १४च्या बाजूने मतदान झाले. जनता पार्टीचा कोणताही सदस्या यापुढे आरएसएसचा सदस्य होऊ शकत नाही, अशी घोषणा जनसंघाने केली. यावेळी अडवाणी आणि वाजपेयीसह जनसंघाच्या नेत्यांनी यावेळी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षातून ही एक प्रकारची अप्रत्यक्षरित्या हकालपट्टी असल्याची भूमिका घेत जनसंघ सदस्यांनी जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच दोन दिवसांत भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.

१९५१ ते १९८०मध्ये नवीन पक्ष ते १९८४मध्ये निवडणुकांमध्ये फक्त दोन मते जिंकणाऱ्या भाजपने २०१४मध्ये मोठा विजय मिळवला. भाजपच्या उभारणीत वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर यासारख्या दिग्गज नेत्यांचा मोठा हातभार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी सहकारी पक्षांच्या जोडीने देशात सरकार स्थापन करण्यासही यश मिळवले. २०१४मध्ये पंतप्रधाना पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

जनसंघाची स्थापना

२१ ऑक्टोबर १९५१ मध्ये दिल्लीतील कन्या माध्यमिक विद्यालय परिसरात भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी आयताकृती भगवा झेंडा पक्षाचे चिन्ह म्हणून समोर आले. १९५२मध्ये निवडणुका जाहीर होतान भारतीय जनसंघाने तीन जागा जिंकल्या.

आणिबाणी आणि जनता पार्टी
१९७१मधील लोकसभा निवडणूकांमध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठा विजय मिळाला. तर, भारतीय जनसंघाला २२ जागांवर विजय मिळाला. १९७५- १९७७ पर्यंत देशात आणिबाणी लागू करण्यात आली आणि अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले. आणिबाणीनंतर १९७७मध्ये भारतीय जनसंघ आणि जनता पार्टी वेगळे झाले.

पहिल्या निवडणुकीत भाजपला २ जागांवर विजय

जनता पार्टीमध्ये सुरु असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पार्टीचे नुकसान झाले. १९८०मध्ये देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा उदय झाला. ६ एप्रिलला भाजपची स्थापना करण्यात आली. ३१ ऑक्टोबर १९८४मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखविरोधी हिंसाचार देशभरात उसळला. लोकसभा निवडणुकीत यावेळी काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट उसळली. या लाटेत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आणि भाजपल्या पहिल्याच निवडणुकीत फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.

१९८६मध्ये लालकृष्ण आडवाणी पार्टीचे अध्यक्ष बनले. १९८६-८९मध्ये बोफोर्स घोटाळ्या प्रकरणी भाजपने मोठे आंदोलन छेडले. १९८९मध्ये भाजपा आणि शिवसेनेत युती झाली. युतीनंतर भाजपला पुढील निवडणुकीत ८५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत बोफोर्स घोटाळ्याचा मुद्दा अधिक चर्चेत होता.

राममंदिर आंदोलन
जून १९८९मध्ये पालमपूर (हिमाचल प्रदेश) भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम जन्मभूमी आंदोलनाच्या समर्थनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा हा मुद्दा त्यावेळी देशात चर्चेचा विषय होता. २५ सप्टेंबरमध्ये आडवाणी की राम रथयात्रा सोमनाथपासून सुरु झाली होती. ३० ऑक्टोबर रोजी ही रथयात्रा आयोध्येत पोहचल्यानंतर कार सेवामध्ये सहभागी झाली. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या आदेशानंतर अडवाणी यांना अटक करण्यात आली. यानंतर आयोध्येत मोठ्या संख्येने कारसेवक पोहचले. १९९१मध्ये निवडणुकीत भाजपला १२० जागांवर यश आले. १९९१ ते १९९३ पर्यंत मुरली मनोहर जोशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९९८ पर्यंत लालकृष्ण आडवाणी अध्यक्ष होते. यूपी, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मतदारांमध्ये वाढ झाली.

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी नियुक्ती

१९९६मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला १६१ जागांवर विजय मिळवला आणि संसदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र, लोकसभेत बहमत सिद्ध न करता आल्याने भाजपचे सरकार १३ दिवसांतच संपुष्टात आले. जनता दलच्या नेतृत्वात इतर पक्षांसोबत युती करुन १९९६मध्ये भाजपने सरकार पुन्हा स्थापन केले. मात्र, हे सरकारही भाजपला टिकवता आलं नाही. १९९८मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणूक घेण्यात आल्या.

१९८८मध्ये भाजपाने राष्ट्रीय जनतांत्रिक युती (NDA)चं नेतृत्व केलं. या युतीत समता पार्टी, शिरोमणी अकाली दल, शिवसेना, AIADMK आणि बिजू जनता दल हे पक्ष सहभागी होते. अटल बिहारी वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. मात्र, अण्णाद्रमुक पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यानंतर १९९९मध्ये भाजपचं सरकार पुन्हा कोसळलं आणि पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. याचदरम्यान पोखरण परमाणू चाचणीही घेण्यात आली.

१३ ऑक्टोबर १९९९मध्ये एनडीएने ३०३ जागांवर जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला सर्वाधिक १८३ जागांवर विजय मिळवता आला आणि अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. २००९च्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आणि पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं.

भाजपचे अच्छे दिन

२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाजपला देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आणले. मोदींच्या नेतृत्वात भाजपने २८२ जागांवर विजय मिळवला. २६ मार्च २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. २०१९च्या निवडणुकांमध्येही भाजपाने ३०३ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here