पुणे / खेड : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात काही वर्षांपूर्वी मुलगा हवा या अट्टाहासापोटी मुलींची गर्भातच किंवा जन्मताच हत्या करण्याचं प्रमाण प्रचंड होतं. मात्र, आता परिस्थितीमध्ये मोठा बदल होताना पहायला मिळत आहे. याचं उत्तम उदाहरण पुण्यात समोर आलं आहे.

खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथे जन्मलेल्या मुलीला चक्क हेलिकॉप्टरमधून घरी आणून भव्य दिव्य अशा स्वरूपात तिचे स्वागत करण्यात आलं. मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही आपण ऐकल्या आहेत पाहिल्याही आहेत. पण मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरण्याची घटना प्रथमच घडली आहे.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे पाच दिवस धोक्याचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तर आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले. गावात हेलिकॉप्टर उतरताना बघण्यासाठी आणि मुलीची एक झलक बघण्यासाठी गावकरीही उपस्थित होते. आनंदानं, उत्साहानं मुलीच्या जन्माच्या शुभेच्छांच्या जयघोषात चिमुरडीचे वडिलांनी चिमुकल्या मुलीला आपल्या हातात घेत हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले.

वास्तविक ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबानं आपल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून आणून तिच्या जन्माचा आनंद साजरा केला ही अतिशय उल्लेखनीय घटना असून, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलं आहे, यात शंका नाही.

उन्हाळ्यापासून स्वतःचे सरंक्षण कसे कराल?; या टिप्स लक्षात ठेवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here