आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आमचं हिंदुत्व हे लोकांना दिलेली वचन पूर्ण करण्याचं आहे. ज्या पक्षांचा तुम्ही उल्लेख केलाय. त्यांना मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो. पण आता त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम ही एमआयएमची आहे आणि सी टीम मनसे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मनसेवर हल्लाबोल केला होता. जो पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा टोलाही आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला होता.
राजू शेट्टींचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य: फडणवीस
राजू शेट्टी यांनी मंगळवारी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. राजू शेट्टी यांनी कायम सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचे राजकारण केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याविरोधात आवाज उठवला म्हणून लोक त्यांच्यापाठी आले. मात्र, महाविकासआघाडीसोबत गेल्याने राजू शेट्टी यांच्या विश्वासर्हतेवर परिणाम झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन राजू शेट्टी यांना संपवण्याचा डाव आखला होता. ही गोष्ट राजू शेट्टी यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.