रणबीर कपूर आणि आलिया भट अनेक वर्षांपासून रिलेशनमध्येआहेत. त्यांच्या चाहत्यांना हे दोघं कधी लग्न करतात याची खूप उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरच्या आईला नीतू कपूर यांना सुनेला कधी घरी आणणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी नीतू कपूर यांनी हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असं सांगितलं होतं. आता रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या विधींना १३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
Photo : Ex Couple आले एकत्र ; हृतिक-सुझान यांची नवीन जोडीदारांसोबत धम्माल पार्टी
आलियाच्या आजोबांची इच्छा
ई-टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार सोनी राजदानचे वडील आणि आलियाच्या आजोबांची तब्येत गंभीर आहे. आपल्या नातीचं लग्न पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा आहे.त्यांची प्रकृती लक्षात घेऊन या दोघांचं लग्न लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळ्याच्या ठिकाणीपासून ते लग्नसोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांपर्यंत, रिसेप्शन पार्टीपर्यंतच्या बातम्या हळूहळू आता समोर येत आहेत.
रणबीर आलियाचं लग्न होणार इथं
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचं लग्न कपूर घराण्याच्या खानदानी घरात अर्थात आरके बंगल्यामध्ये होणार आहे.रिपोर्ट्सनुसार रणबीर आणि आलिया गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. हे दोघंही जण त्यांच्या विवाहस्थळाच्या ठिकाणाची तयारी करत होतं. ई-टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार आरके बंगल्यामध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

इथं होणार रणबीरची बॅचलर पार्टी
आलियाशी लग्न होण्यापूर्वी रणबीर कपूर शानदार बॅचलर पार्टी करणार आहे. रणबीरनं त्याच्या बॅचलर पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रित केल्याचं समजते. त्यातील काही जणांची नावं समोर आली आहेत. त्यामध्ये अयान मुखर्जी, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रणबीरचे काही लहानपणीचे मित्र देखील यापार्टीत सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरनं त्याची ही बॅचलर पार्टी घरीच ठेवली आहे.
Video : शूटिंगला जाताना अचानक थांबले अनुपम खेर, बाइकस्वाराला म्हणाले…
लग्नसोहळ्याला ४५० पाहुण्यांना निमंत्रण
ई टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नसोहळ्यासाठी अधिकृतपणे वऱ्हाडी मंडळींना आमंत्रित केलेलं नाही. परंतु त्यांना लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आधीपासून कळवण्यात आलं आहे. या दोघांचं लग्न आलिशान पद्धतीनं होणार असल्याचं सांगितलं जात आहे. लग्नसोहळ्याल ४५० जणांना आमंत्रित करण्यात येणार आहे. रणबीरनं आतापर्यंत ज्या ज्या टेक्निशअनबरोबर काम केलं आहे त्या सगळ्यांना लग्नासाठी आमंत्रित केलं आहे. त्यामध्ये हेअर, मेकअप आर्टिस्टपासून स्पॉटबॉय, असिटंटपर्यंत सगळ्यांना आमंत्रित केलं आहे.

हे असतील वऱ्हाडी मंडळी
रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्यामध्ये जे कलाकार वऱ्हाडी म्हणून सहभागी होणार आहे त्यांची नावं आता समोर आली आहेत. त्यामध्ये अर्जुन कपूर, संजय लीला भन्साळी, आकांक्षा आणि अनुष्का रंजन, वरुण धवन-नताशा दलाल, डिझायनर मसाबा गुप्ता, शाहरुख खान, मनीष मल्होत्रा यांच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय असंही सांगितलं जात आहे की, रणबीर आणि आलियानं त्यांच्या लग्नाला विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना बोलावलं आहे. रणबीर दीपिका आणि कतरिनाबरोबर काही काळ रिलेशनमध्ये होता. परंतु आता रणबीर आणि दीपिकामध्ये मैत्रीचं नातं आहे. परंतु कतरिनापासून रणबीर अजून काहीसा लांब आहे.