Sharad Pawar | संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील मालत्ता ईडीने जप्त केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

Pravin Darekar
Pravin Darekar | केंद्रीय तपास यंत्रणा श्रीधर पाटणकर यांच्या माध्यमातून मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत.

हायलाइट्स:

  • केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागला आहे
  • संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसे दूत आणि शरद पवार यांचे भक्त आहे
मुंबई:शरद पवार हे उत्तमप्रकारे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ओळखले जातात. संजय राऊत यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईनंतर शरद पवार यांनी याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. ही भेट केंद्रीय तपास यंत्रणांचा जो ससेमिरा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागला आहे, त्यासंदर्भात असू शकते.
शरद पवारांनी का घेतली PM मोदींची भेट?; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
केंद्रीय तपास यंत्रणा श्रीधर पाटणकर यांच्या माध्यमातून मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेनेचे नेते आहेत. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसे दूत आणि शरद पवार यांचे भक्त आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर हे सगळं कुठेतरी आपल्यापर्यंत पोहोचलंय,याची जाणीव शरद पवार यांनी झाली असेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागे शरद पवार यांचा समन्वय किंवा तडजोडीचा उद्देश असू शकतो. शेवटी शरद पवार हे डॅमेज कंट्रोलमध्ये माहीर आहेत, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला माहिती आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
Devendra Fadnavis: मनसेला भाजपची ‘सी टीम’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना फडणवीसांनी सुनावलं
प्रवीण दरेकर हे बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी-पवार भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता सपशेल फेटाळून लावली. यामधून मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील, अशी तिळमात्रही शंका वाटत नसल्याचे सांगितले. दिल्लीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात उभय नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. मोदी आणि पवार यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता शरद पवार थोड्याचवेळात दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी पवार काय खुलासा करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp chief sharad pawar meet pm narendra modi to save sanjay raut says pravin darekar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here