औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिऱ्यांविरुद्ध, एमआयएमच्याच एका माजी नगरसेवकाने जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून जिल्हाध्यक्षावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर विकास प्रकाश एडके (रा. पदमपुरा) असं तक्रार देणाऱ्या माजी नगरसेवकाचं नाव आहे.

विकास एडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खडकेश्वर वॉर्डातून २०१५ मध्ये ते एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान ८ मार्च रोजी त्यांचे मित्र शासकीय कंत्राटदार सय्यद सलाउद्दीन यांना रात्री मारहाण झाल्याचे समजले. त्यांना मदतीसाठी एडके सिटीचौक ठाण्यात पोहोचले. त्याच वेळी समीर बिल्डर आणि एमआयएमचे पदाधिकारी मुन्शी पटेल काही सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी सय्यद यांच्यासह एडकेंना तक्रार न देता बाहेर जाऊन बोलू, असे सांगितले. ठाण्याबाहेर येताच एडके यांना समीर बिल्डर यांनी जातिवाचक उल्लेख करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं विकास एडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

mim on pawar-modi meet: शरद पवार-मोदींच्या भेटीवर एमआयएमचा सवाल; ट्विट करत जलील म्हणाले….
तक्रार दिल्यास हातपाय तोडू…

एडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, आरोपींनी आपल्याला तक्रार दिल्यास तुमचे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली होती. मुन्शी पटेल यांनीदेखील जातिवाचक शिवीगाळ करून आमच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आम्हाला काहीही करू शकत नाहीत. त्यात तू दिलेल्या तक्रारीमुळे काय होणार, असे म्हणून पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

farmer’s issue: ऊस उत्पादक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, धक्कादायक कारण समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here