मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाचीच चर्चा आहे. दर दिवशी त्यांच्या लग्नासंबंधातील नवीन नवीन माहिती समोर येत आहे. रणबीरच्या बॅचलर पार्टीपासून ते या दोघांचं लग्न कोणत्या पद्धतीनं होणार, मग ते हनीमूनला कुठं जाणार या आणि अशा अनेक बातम्या सातत्यानं येत आहेत. रणबीर आणि आलियाचं लग्न १७ एप्रिल रोजी चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसंच या दोघांच्या लग्नविधींना १३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या सगळ्या बातम्या येत असताना आता रणबीर कपूरचे वडील आणि अभिनेते दिवंगत ऋषी कूपर आणि नीतू कपूर यांचं ४२ वर्षांपूर्वीचं लग्नाचं रिसेप्शन कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या कार्डावर एक खास लोगो दिसत आहे. हा लोगो म्हणजे RK असं लिहिलेलं दिसत आहे. ऋषी आणि नीतू यांचं लग्न देखील RK हाऊसमध्ये झालं होतं. त्यामुळेच रणबीरनं देखील या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ranbir-Alia Wedding Details: रणबीरच्या लग्नाला दीपिका, कतरिनाची उपस्थिती?

ऋषी कपूर नीतू सिंग

ऋषी-नीतूचं १९८० मध्ये झालं होतं लग्न

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं लग्न १९८० मध्ये झालं होतं. त्यांनी २३ जानेवारी रोजी लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती. त्यामध्ये दोघांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. रिसेप्शनसाठी जे कार्ड वाटण्यात आलं होतं त्यात लिहिलं होती की, मिस्टर अँड मिसेस राज कपूर यांचा मुलगा ऋषी आणि नीतू कपूर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या पार्टीमध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी निमंत्रित करत आहे.

Photo : Ex Couple आले एकत्र ; हृतिक-सुझान यांची नवीन जोडीदारांसोबत धम्माल पार्टी

लग्नपत्रिका

आलिया रणबीरचा सिनेमा

रणबीर आणि आलियाच्या कामाबद्दल सांगायचं तर ते लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. अयान मुखर्जी यानं दिग्दर्शित केलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात ते दिसणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन देखील आहेत. हा सिनेमा ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय आलियाकडे रॉकी और रानी की प्रेम कहानी, जी ले जरा, डार्लिंग्ज हे सिनेमे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here