Parbhani Rape Case: Frequent Rape Of A Minor Girl In Parbhani Inally Filing A Case | आई आजारी असल्याचं सांगत मुलीला शाळेतून नेलं लॉजवर, मित्रालाही सांगितलं अन्…
परभणी : कितीही जनजागृती केली तरी महिला, मुली सुरक्षित नाही हे वारंवार समोर येतं. असाच एक भयंकर प्रकार परभणीत समोर आला आहे. तुझी आई आजारी आहे, असं सांगून अल्पवयीन मुलीला लॉजवर घेऊन जात एका ४५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना परभणी शहरात घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वज्रकुमार बांडे वय ४५ वर्ष याच्यासह दोन आरोपींविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये आरोपी वज्रकुमार बोंडे याने तुझी आई आजारी आहे, असं सांगून लॉजवर घेऊन गेला होता. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मुलीला धमकी देऊन तिच्यावर दोन ते तीन वेळा लॉजवर घेऊन जाऊन अत्याचार केला. लग्नाच्या ५ दिवसानंतर पतीला कळलं धक्कादायक सत्य, पत्नीला किल्ल्यावर फिरण्यासाठी नेलं आणि… सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने त्याच्यासोबत इतर एका व्यक्तीला घेऊन अल्पवयीन मुलीला खानापूर परिसरातील एका खोलीत नेऊन दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने नवामोंढा पोलीस मंगळवारी ६ एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन पुरुष आणि एका महिलेविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.