चंद्रपूर लाईव्ह न्युज: धक्कादायक! कुटूंब झोपलं असताना त्यांच्या शेजारीच होता बिबट्या, सासूबाई शौचालयाला उठल्या अन्… – leopard attacks family in chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील उसेगाव इथं भगवान आवारी यांच्या घरात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या घुसला होता. सकाळी ९ च्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आले. काही दिवस देखरेखीत ठेवून लवकरच त्याची मोकळ्या अधिवासात मुक्तता केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर वन विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली आहे.
खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावलीपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या उसेगाव येथे आवारी यांच्या घरी चार जण घरात झोपले होते. पहाटे शौचालयासाठी भगवान यांची आई सिंधुबाई उठल्या. तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. नेमके काय आहे ? हे बघण्यासाठी त्या गेल्या. मात्र, त्याच वेळेस सिंधूबाई यांची सून शशिकला बाई यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. Heatwave Alert! पुढचे ३ दिवस राज्यासाठी धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
शशिकला प्रतिकार करत स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडल्या. खाटेखाली बिबट असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं. घरात बिबट शिरल्याची माहिती उपसरपंच सुनील पाल यांना दिली गेली. पाल यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सावली येथील वनरक्षकानी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सकाळी वनविभागाची टीम आणि इको प्रोचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अवघ्या काही वेळातच या बिबट्याला पकडण्यात यश आले. मागील काही दिवसांपासून हा बिबट गावातील कोंबड्या, बकऱ्यांवर ताव मारीत होता. तो जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सूटकेचा श्वास घेतला.